काबुल – अफगाणिस्तानवर तालिबानने पुन्हा एकदा कब्जा केल्यानंतर जगातील बहुतेक देशांनी अफगाणिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत बंद केल्याने तालिबान्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत सरकार चालवण्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी आता तालिबान्यांनी ड्रग्जच्या व्यवहारातून उपलब्ध होणाऱ्या पैशाचा आसरा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या अफगाणिस्तान ला दुनिया भरातल्या सर्व देशांकडून 7.40 लाख करोडची आर्थिक मदत मिळते पण सर्वच देशांनी ही मदत देणे थांबवले आहे अफगाणिस्तानसाठी असलेला 70 हजार 300 कोटी रुपयांचा रिझर्व फंड ही अमेरिकेने गोठवला आहे .
नाणेनिधीनेही 3750 कोटी रुपयांचा आपत्कालीन रिझर्व फंड फ्रिज केला त्यामुळे नव्या सरकारचा कारभार करण्यासाठी पैसा कुठून आणायचा हा प्रश्न तालिबान्यांसमोर उपस्थित झाला आहे. तालिबानी आता अमली पदार्थ व्यवहारातून उपलब्ध होणारा पैसा सरकार चालवण्यासाठी वापरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
त्यासाठी आंतरराष्ट्रीय नेटवर्क आता तालीबानी अधिक मजबूत करण्याचा धोका समोर आला आहे अफगाणिस्तान मध्ये पिकणाऱ्या अफूचे ड्रग च्या विविध पर्यायांमध्ये रूपांतर करून युरोप अमेरिका आणि भारतासह अनेक आशियाई देशांमध्ये हे अमली पदार्थ विकून मोठ्या प्रमाणावर पैसा मिळवण्याचा आता तालिबान्यांचा इरादा आहे.
तालिबान शी संबंधित असलेले सहा लाख पेक्षा जास्त लोक फक्त अफूच्या शेतीवर अवलंबून आहेत तालिबान्यांच्या दहशतवादी कृत्यांसाठी ही अशाच व्यवहारातून उपलब्ध झालेल्या पैशातूनच त्यांना आर्थिक मदत केली जात होती 2020 मध्ये तालिबान्यांनी ड्रगच्या व्यवहारातून तब्बल 11000 कोटी रुपये कमावले होते सर्वात नशीली अप्पू अफगाणिस्तान मधील शेतांमध्ये पिकते आणि त्याच्या आधारे अनेक घातक अमली पदार्थ तयार केले जातात.
या सर्व व्यवहारांमध्ये अफगाणिस्तानला नेहमीच पाकिस्तानची मदत होते अफगाणिस्तानात तयार होणारी अफू आणि हीरोइन हे अमली पदार्थ पाकिस्तानच्या माध्यमातूनच जगभर पसरवले जातात.
याशिवाय तालिबान्यांनी अरब अमिराती चीन वर्जिन आयलँड लॅटिव्हिया हॉंगकॉंग आणि तुर्कस्तान या देशांमध्येही आपले नेटवर्क केले आहे सरकार चालवण्यासाठी पैसा उपलब्ध करण्यासाठी ही सर्व नेटवर्क कार्यरत करून मोठ्या प्रमाणावर निधी जमा करण्याची तालिबान्यांची योजना आहे