पिंपरी – महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्या, नवीन वसाहती, हौसिंग सोसायट्यांना अडचणीच्या प्रसंगी पाणीपुरवठा करणे, रस्त्यांचे दुभाजक आणि पदपथांच्या कडेच्या झाडांना पाणी देण्यासाठी महापालिका टॅंकरचा वापर करत असते. त्यासाठीच टाटा मोटर्स कंपनीकडून थेट पद्धतीने सहा टॅंकर घेण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
आठ हजार लिटर क्षमतेचे आणि सहा हजार लिटर क्षमतेचा टॅंकर असेल. त्यांच्या खरेदीसाठी एक कोटी 49 लाख 15 हजार 400 रुपये खर्च येणार आहे, तसेच आरटीओ परवान्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये असे 60 हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे एकूण एक कोटी 49 लाख 75 हजार 400 रुपये खर्च होणार आहे. नवीन टॅंकर अ, क, इ आणि फ, आठ हजार लिटर क्षमतेचे पाच क्षेत्रीय कार्यालयांना दिले जातील.