मुंबई : एसटी महामंडळाने परिपत्रक सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. एसटी महामंडळाच्या बसेसच्या काचांवर देवी आणि देवतांचे फोटो किंवा स्टीकर श्रद्धेपोटी लावले जात असल्याच्या प्रकार समोर आल्यानंतर एसटी महामंडळाने परिपत्रक या संदर्भात पत्रक काढले आहे.
या पत्रकात एसटीच्या कांचावर कोणत्याही प्रकारची स्टीकर चिकटवू नये असे आदेश काढण्यात आले आहे, हे फोटो लावण्याने ड्रायव्हरला रस्त्यावरील वाहने दिसण्यास अडथळा येऊन अपघाताला निमंत्रण मिळू शकते. त्यामुळे एसटीच्या कांचावर कोणत्याही प्रकारची स्टीकर चिकटवू नये असे आदेशच काढले आहेत. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला अशा प्रकारचे परिपत्रक लिहून एसटी काचा स्वच्छ असाव्यात असे म्हटले आहे.
महामंडळाचे महाव्यवस्थापक ( यंत्र अभियंता ) नं.शि.कोलारकर यांनी नागपूर विभागाला पत्रक लिहिले आहे की, एसटीवर काळुआई, बाळूमामा, जय मल्हार, करवीर वासिनी, विठुमाऊलीचे किंवा इतर कोणतेही देवीदेवतांचे फोटो लावू नयेत ज्यामुळे चालकाची दृश्यमानता कमी होईल असेही या पत्रकात लिहिले आहे.