नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा जगभरात कहर सुरु आहे. भारतातही कोरोना विषाणूच्या रुग्णामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान कोरोना विषाणूची लागण झालेली एकनवविवाहित महिला बंगळूर येथून पळून गेली आहे.
या नवविवाहितेला बंगरुळुच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षात उपचार सुरु होते. सदरील महिला आग्रा येथील असून, ती आपल्या पतीसोबत इटलीवरून हानीमून करुन बंगळूरमध्ये परतली होती.
आरोग्य विभागाला महिला पळून गेल्याची माहिती काळातच सदरील महिलेचा शोध सुरु आहे. तसेच या नवविवाहितेच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध आरोग्य विभागातर्फे घेण्यात येत आहे.
विमानांमध्ये प्रवासादरम्यान या नवविवाहितेच्या संपर्कात आलेल्या प्रवाशांची देखील तपासणी करण्यात येत आहे. या महिलेच्या परिवारातील ८ जण राहत्या घरी विलगीकरण कक्षात होते.
दरम्यान केंद्र सरकार आणि राज्य सरकारतर्फे नागरिकांना आवाहन काण्यात येत आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.