कोरोनाबाधित रुग्णाची पाचव्या मजल्यावरून उडी

बेंगळुरू: कर्नाटकमधील बेंगळूरु येथे कोरोना विषाणूची लागण झालेल्या 50 वर्षीय व्यक्तीने रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, व्हिक्टोरिया हॉस्पिटलच्या ट्रॉमा वार्डमध्ये या रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी त्या व्यक्तीला श्वसनाच्या तक्रारीसह रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला किडनीचा त्रास देखील होता.

सदरील व्यक्तीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यासंदर्भात चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. इंडियन एक्स्प्रेसच्या म्हणण्यानुसार, आरोग्याच्या समस्या असूनही रुग्णाची प्रकृती स्थिर होती. त्याचे समुपदेशनही चालू होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने नाश्ताही केला होता. रविवारी कोरोना विषाणूमुळे त्याच रुग्णालयात एका 45 वर्षीय रूग्णाचा मृत्यू झाला होता. त्या रुग्णाला मधुमेहाचा आधी टीबी आणि न्यूमोनिया आजार होता.

दरम्यान, र्नाटकमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 500  च्या वर पोहचली आहे, तर आतापर्यंत १९ कोरोना रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.