कोरोना विषाणू चीनमध्ये परतला

बीजिंग : चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये गुरुवारी तब्बल ५६ दिवसानंतर कोरोना विषाणूची लागण झाल्याचे पहिले प्रकरण उघडकीस आले. बीजिंगमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या आणखी 2 प्रकरणांसह चीनमध्ये 10 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे बीजिंगमधील काही भाग लॉकडाउन करण्यात आलेला आहे.

बुधवारी ९ जून ला रुग्णालयातील शेवटच्या कोरोना रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला होता. गेल्या २ महिन्यात बीजिंगमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णात भर पडलेली नव्हती. परंतु आता पुन्ह्याने कोरोनाने डोके वर काढल्यामुळे कोरोना एवढ्या सहजासहजी पाठ सोडणार नसल्याचे दिसून येत आहे.

आरोग्यअधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शहरातील मींग फूड रिसर्च सेंटरमध्ये काम करणारे दोन सहकारी शहरातील फेंगताई जिल्ह्यात पॉसिटीव्ह आढळले. दोन्ही रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या दोन रुग्णांपैकी एकाने गेल्या आठवड्यात क्यिंगदाओ शहरात प्रवास केला होता.

दरम्यान, एका प्राथमिक शाळेतील ५० विद्यार्थी आणि शिक्षकांना होम क्वारंटीन करण्यात आले होते. बीजिंगच्या एका आरोग्य अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले की, विद्यार्थी आणि कुटुंबातील अन्य सदस्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. परंतु शालेय शिक्षक व इतर विद्यार्थी होम क्वारंटीन करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.