थ्रिसुर – केरळ मधील वुहान विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिला जनरल हॉस्पीटल मधून थ्रिसुर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात हलवण्यात आले आहे. तिला तेथे सुरक्षित वॉर्डात ठेवण्यात आले असून हा वार्ड अन्य नागरीकांसाठी प्रतिबंधीत घोषित करण्यात आला आहे.
ही मुलगी चीनच्या वुहान विद्यापीठात शिकत होती. काही दिवसांपुर्वीच ती भारतात केरळ येथे परतली होती. पण तिला ताप आल्याने तिला स्वतालाच आपल्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची संशय आल्याने ती सरकारी जनरल हॉस्पीटल मध्ये दाखल झाली होती. तिच्या रक्ताच्या तपासणीत तिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिला आज थ्रिुसरच्या सुरक्षित वॉर्डात हलवण्यात आले आहे. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी या रूग्णाविषयी गुरूवारी मध्यरात्री आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून तिच्या सुरक्षित वॉर्डाची तेथे सोय केली.
या मेडिकल कॉलेज मधील या सुरक्षित स्पेशल वॉर्डात एकाच वेळी अशा प्रकारचे 24 रूग्ण ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. केरळातील एकूण 1053 रूग्णांची कोरोनाचे संशयित रूग्ण म्हणून तपासणी केली जात आहे. त्यामुळे या राज्यातील वैद्यकीय आणिबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.