राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांवर

उपचाराखालील रुग्णांची संख्या घटली

मुंबई :- राज्यात काल (शनिवार,  दि.३ अाॅक्टोबर) १६ हजार ८३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १४ हजार ३४८ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत ११ लाख ३४ हजार ५५५ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.३ टक्के आहे. राज्यातील उपचाराखालील रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या २ लाख ५८ हजार १०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत (शनिवार, दि.३) पाठविण्यात आलेल्या ७० लाख ३५ हजार २९६ नमुन्यांपैकी १४ लाख ३० हजार ८६१ नमुने पॉझिटिव्ह ( २०.३४ टक्के) आले आहेत. राज्यात २२ लाख ३ हजार ९६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २८ हजार ४१४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात काल (शनिवार, दि.३) २७८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील आतापर्यतच्या एकूण रूग्णांचा तपशिल – 

एकूण: बाधित रुग्ण-(१४,३०,८६१) बरे झालेले रुग्ण-(११,३४,५५५),मृत्यू- (३७,७५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४४०),ॲक्टिव्ह रुग्ण-(२,५८,१०८)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.