चंदीगड: पंजाबच्या पतियाळा जिल्ह्यात रविवारी (12 एप्रिल) सकाळी निहंग शिखांच्या जमावाने पोलिसांवर तलवारीने हल्ला केला होता. या हल्ल्यात एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अधिकाऱ्याचा हात कापला गेला. या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. यानंतर पोलीस अधिकाऱ्याला तातडीने पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी साडे सात तासांच्या शस्त्रक्रियेनंतर पोलीस अधिकारी हरजीत सिंह यांचा हात जोडला, अशी माहिती स्वत: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दिली आहे.
“मला खूप आनंद होत आहे की सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरजीत सिंह यांच्यावर पीजीआयमध्ये साडे सात तासांची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. मी डॉक्टर आणि त्यांच्या टीमचे आभार व्यक्त करतो. त्यासोबत प्रार्थना करतो की हरजीत सिंह लवकर ठीक होऊ दे”, असं ट्वीट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केले.
Spoke to ASI Harjeet Singh, who is recovering after his operation, to enquire about his health. The composure & bravery with which he spoke today is truly worthy of admiration. Wishing him a speedy recovery. pic.twitter.com/dVYk01S5Gk
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) April 13, 2020