शेटफळ हवेली येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
रेडा- करोना काळात प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व दाखवून, देशोन्नतीसाठी आपले योगदान दिले आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
शेटफळ हवेली (ता. इंदापूर) येथे भैरवनाथ मंदिरात गुरुवारी (दि. 11) सकाळी 10 वाजता विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी गावातील गरजू गरीब कुटुंबांना वस्तू स्वरूपात मदत करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, बाळासाहेब करगळ, सचिन सपकळ, संतोष बनकर, स्वप्निल करगळ, महिला तालुकाध्यक्षा छाया पडसळकर, इंदापूर शहाराध्यक्षा उमा इंगुले, कार्याध्यक्षा स्मिता पवार, डॉ. शरद पडसळकर, माजी नगरसेविका उज्वला चौगुले आदी उपस्थित होते.
यावेळी महिलांना मर्दानी महाराष्ट्र सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये तहसीलदार सोनाली मेटकरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, तलाठी वृषाली कारंडे, अंगणवाडी सेविका स्वाती शिंदे, शुभांगी शिंदे, परिचारिका उषा मिसाळ, आशा वर्कर संगीता बरळ, सुषमा वारे, रेखा मोरे, पत्रकार मोहिनी शिंदे, मदतनीस द्रौपदी सपकळ, पोलीस नाईक शुभांगी खंडागळे यांचा सन्मान करण्यात आला. बाळासाहेब करगळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संतोष बनकर यांनी आभार मानले.