बांधकाम विभागाची संरक्षक भिंत कोसळली

जुन्नरमध्ये निकृष्ट दर्जाच्या कामाचा उत्तम नमुना

जुन्नर – जुन्नर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या इमारतीची संरक्षक भिंतीचा काही भाग निकृष्ट कामाने व जोरदार पावसाने शनिवारी (दि. 28) जमीनदोस्त झाला. पंचायत समिती समोरच्या रस्त्यावर तसेच रोकडे मारुती मंदिराच्या मागे पडलेल्या या संरक्षक भिंतीने कोणतीही जीवित हानी झाली नाही; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामाचा प्रश्‍न चर्चेत आला.

जुन्नर येथे जुने व नवीन शासकीय विश्रामगृह तसेच बगीचा आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत सार्वजनिक बांधकाम विभागाने 12 वर्षांपूर्वी भिंतीचे बांधकाम करून आतमध्ये सपाटीकरण केले होते. आतील बाजूने केलेल्या मातीच्या भरावाचा दाब या भिंतीवर आल्याने भिंत बाहेरील रस्त्याचे बाजुने तसेच रोकडे मारुती मंदिराच्या बाजुला झुकल्याचे दिसत होते. त्यामुळे पावसाळ्यात ही संरक्षक भिंत कोसळू शकते या शक्‍यतेने बांधकाम विभागाने भिंतीच्या बाजुला डॉंबराची मोकळी टिपाडे लावली होती; परंतु दोन दिवस सुरु असलेल्या संततधार पावसाने ही संरक्षक भिंत रोकडे मारुती मंदिराच्या बाजुला कोसळली. प्रवेशद्वाराच्या अलीकडे अजुनही धोकादायक अवस्थेत संरक्षक भिंत उभी आहे. रोकडे मारुती मंदिराच्या लगत असलेल्या वडार समाजाच्या वस्तीतील स्वछतागृहाच्या मागे अवघ्या सहा फूट अंतरावर देखील ही धोकादायक भिंत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)