BJP leader’s warning – पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील खरगपूर येथे रस्त्याच्या उद्घाटन समारंभात भाजपचे माजी खासदार दिलीप घोष यांना स्थानिक महिलांनी विरोध केला.
यादरम्यान, महिलांच्या प्रश्नांमुळे आणि निषेधांमुळे घोष संतापले तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली. वाद वाढत असताना, घोष यांनी महिलांना इशारा दिला की, जास्त ओरडू नका, नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील्.
शुक्रवारी वॉर्ड क्रमांक ६ मध्ये एका नव्याने बांधलेल्या रस्त्याचे उद्घाटन करण्यासाठी गेलेल्या घोष यांना स्थानिक महिलांनी घेरले. खासदार असताना त्यांच्या अनुपस्थितीवर महिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे माजी भाजपा प्रदेशाध्यक्ष संतापले.
घोष यांना पाहून एका महिलेने विचारले की, तुम्ही इतका वेळ कुठे होता? तुम्ही खासदार असताना आम्हाला तुम्ही एक दिवसही दिसले नाही.
आता, जेव्हा आमचे नगरसेवक रस्ता बांधत आहेत, तेव्हा तुम्ही इथे कशाला आला आहात? यावर घोष यांनी आक्रमकपणे प्रतिक्रिया दिली आणि निदर्शकांना तृणमूल समर्थक असल्याचे संबोधले. दिलीप घोष म्हणाले की, मी ते माझ्या स्वतःच्या पैशाने बांधले आहे, तुमच्या वडिलांच्या पैशाने नाही.
तृणमूल काँग्रेसचे नगरसेवक आणि खरगपूरचे माजी आमदार सरकार यांनी घोष यांच्या कृतीचा निषेध केला आहे. त्यांनी वापरलेली भाषा माजी खासदारासाठी अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
घोष आता खासदार नसतानाही रस्त्याचे उद्घाटन करण्यासाठी का गेले, असा प्रश्नही त्यांनी विचारला. राज्य विधानसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधी, या घटनेमुळे तृणमूलला भाजपला लक्ष्य करण्याची संधी मिळाली आहे.