कॉंग्रेसशी आमची देशभरात कोठेही आघाडी नसेल – मार्क्‍सवादी नेत्याचा दावा

कोट्टायम – पश्‍चिम बंगालमध्ये तृणमुल कॉंग्रेसच्या विरोधात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि डाव्या पक्षांमध्ये आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच केरळातील एका ज्येष्ठ मार्क्‍सवादी नेत्याने मात्र आमचा पक्ष देशभरात कोठेही कॉंग्रेसशी आघाडी करणार नाही असे म्हटले आहे. या पक्षाचे केरळचे सेक्रेटरी कोडियेरी बालकृष्णन यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले की आम्ही देशात कोठेही कॉंग्रेसशी आघाडी करण्याचा विचारात नाही.

दरम्यान मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी कालच राज्यनिहाय स्थितीचा विचार करून आम्ही कॉंग्रेसशी आघाडी करण्याचा प्रयत्न करू असे म्हटले होते. त्यांच्या या दाव्यावर बालकृष्णन यांनी पाणी फेरले आहे. पण बालकृष्णन यांच्या या भूमिकेला पक्षाकडून किती महत्व दिले जाते ते पहाणे औत्स्युक्‍याचे ठरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.