नवी दिल्ली : गांधी कुटुंबियांची एसपीजीसुरक्षा हटवणं, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ प्रकरण अशा विविध मुद्यांवरुन आज लोकसभेत गदारोळ झाला. कॉंग्रेस, द्रमुक आणि डाव्या पक्षांचे सदस्य हौद्यात उतरले आणि त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या गदारोळातच लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरु होता. सभागृहात घोषणाबाजी करणाऱ्या संस्थांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा सभापती ओम बिर्ला यांनी यावेळी दिला. या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज तीनवाजेपर्यंत तहकूब करावे लागले.
कॉंग्रेस सदस्यांना प्रश्नोत्तराचा तास रद्द करुन या मुद्यांवर चर्चा हवी होती. फारुख अब्दुल्ला आणि इतर नेत्यांच्या त्वरीत सुटकेची मागणी कॉंग्रेसचे सभासद करत होते, तरडीएमके सभासद आयआयटी मद्रासमधे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याला न्याय मिळावा,अशी मागणी करत होते.