पाटणा – बिहार विधानसभा निवडणुकीला रंजक तडका देणारे थीमसॉंग कॉंग्रेसने तयार केले आहे. बोले बिहार, बदले सरकार असे त्या गाण्याचे शीर्षक आहे.
कॉंग्रेसचे प्रचारगीत पक्षाच्या सोशल मीडिया विभागाने तयार केले आहे. ते प्रचारगीत छत्तिसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी रविवारी लॉंच केले. त्यामध्ये सर्वसमावेशक विकासासाठी सरकार बदलण्याच्या भूमिकेवर जोर देण्यात आला आहे.
कॉंग्रेसच्या प्रचारगीतातून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या 15 वर्षांच्या राजवटीची खिल्ली उडवण्यात आली आहे. बिहारमधील शिक्षणाची दूरवस्था, प्रचंड बेरोजगारी, वाढता भ्रष्टाचार, अनियंत्रित गुन्हेगारी आणि करोना फैलाव रोखण्यातील अपयश या मुद्द्यांवर प्रचारगीतात भर देण्यात आला आहे. त्यामुळे बिहार निवडणुकीतील प्रचाराची धार वाढवण्यासाठी कॉंग्रेस सज्ज झाल्याचे सूचित होत आहे.
पक्षाचे माजी अध्यक्ष यांच्या चालू आठवड्यात बिहारमध्ये दोन प्रचारसभा होणार आहेत. राजदच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या महाआघाडीत सहभागी होऊन कॉंग्रेस बिहारमधील निवडणुकीला सामोरा जात आहे. त्या राज्यात विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. त्यातील 70 जागा कॉंग्रेस लढवत आहे.