नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचार सभेत बोलताना राहुल व प्रियांकांचे वडिल दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर एक आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. स्वताला मिस्टर क्लीन म्हणणारे पंतप्रधान एक नंबरचे भ्रष्टाचारी ठरले असे विधान मोदी यांनी केले होते त्यावर कॉंग्रेसकडून तीव्र टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचार सभेत बोलताना राहुल व प्रियांकांचे वडिल दिवंगत राजीव गांधी स्वताला मिस्टर क्लीन म्हणणारे पंतप्रधान एक नंबरचे भ्रष्टाचारी ठरले असे विधान मोदी यांनी केले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले ट्विट करून मोदीजी आता लढाई संपली आहे, आता आपल्या कर्माची फळे भोगण्यास तयार राहा. आपल्या मनातील जळजळ तुम्ही माझ्या वडिलांवर काढली असली तरी त्यातून तुमचे रक्षण होणार नाही. माझे तुम्हाला प्रेमाचे अलिंगनच राहील असे त्यांनी म्हटले होते. प्रियांका गांधी, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, इत्यादींनीही मोदींच्या या प्रकारच्या टीकेचा निषेध केला आहे.