कॉंग्रेस आणि आपची आघाडी झाली असती भाजपला सोपे गेले असते – केंद्रीय मंत्री हर्षवर्धन

नवी दिल्ली – दिल्लीत आणि अन्य राज्यांत कॉंग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात आघाडी झाली असती तर भाजपला ती स्थिती आणखी सोपी गेली असती असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री व दिल्लीतील भाजपचे नेते हर्षवर्धन यांनी केले आहे. केवळ लोकसभेसाठीच नव्हे तर पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीही आम्हाला त्यांच्यात आघाडी होणे सोपे गेले असते असे ते म्हणाले. हर्षवर्धन हे स्वता दिल्लीतील चांदनी चौक मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यात आघाडी झाली काय किंवा नाहीं झाली काय याचा मला व्यक्तीश काहींच फरक पडत नाही पण या दोन्ही पक्षांमध्ये आज आघाडी झाली असती तर आम्हाला दिल्लीतील पुढील विधानसभा निवडणूकही सोपी गेली असती असे ते म्हणाले. दिल्लीत भाजप या दोन्ही पक्षांपेक्षा फार पुढे आहे असेही त्यांनी म्हटले आहे. हर्षवर्धन यांची या मतदार संघात आम आदमी पक्षाचे पंकज गुप्ता आणि कॉंग्रेसचे जयप्रकाश आगरवाल यांच्याशी लढत होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.