पिंपरी – सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात सध्या 14 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयात मंगळवारी (दि. 9) नव्याने 3 पुरुष रुग्णांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. करोनाबाधितांमध्ये भोर तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे.
रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 1 हजार 919 रुग्णांना करोनाची लागण झाली. त्यातील 751 जणांना आत्तापर्यंत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. एकूण 166 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, 307 जणांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविण्यात आले. 681 रुग्णांना होम क्वॉरंटाइन केले आहे.