भारता शेजारच्या ‘या’ देशातील करोनाची स्थिती बिघडली

ढाका – बांगलादेशातील करोनास्थिती दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालली आहे. आज दिवसभरात बांगलादेशात करोनामुळे 85 मृत्यू आणि 5,727 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

 दैनंदिन करोना रुग्णांची संख्या 13 एप्रिलनंतर सर्वाधिक आहे. 13 एप्रिलला बांगलादेशात 6,028 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तर 29 एप्रिलला 88 जणांचा मृत्यू झाला होता. दैनंदिन पॉझिटिव्हीटीचे प्रमाणही वाढून 20.27 टक्के झाले आहे. हे प्रमाण देखील एप्रिल महिन्यापासूनचे सर्वाधिक आहे.

संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 30 जूनपर्यंत गाझीपूर, नारायणगंज, मुंशीगंज, राजबारी, गोपाळगंज, माणिकगंज आणि मदारपूर या 7 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे. याशिवाय या जिल्यांच्या शेजारच्या जिल्ह्यांमधील कोविडची परिस्थिती पाहता ढाकाकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांना बांगलादेश रेल्वेने स्थगित केल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.