भोपाळ – मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. त्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झाली आहे.
Madhya Pradesh Chief Electoral Officer: Complaint received against BJP Lok Sabha candidate for Bhopal, Pragya Singh Thakur, for her comments on 26/11 martyr (former Mumbai ATS Chief Hemant Karkare). Cognizance taken. The matter is under enquiry. (File pic of Pragya Singh Thakur) pic.twitter.com/CiHl0a1WgD
— ANI (@ANI) April 19, 2019
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एका प्रचारसभेत बोलताना, त्यांनी (हेमंत करकरे) मला चुकीच्या पद्धतीने फसवले होते. मी त्यांना सांगितले होते कि, तुमच्या पूर्ण वंशाचा सर्वनाश होईल. बरोबर सव्वा महिन्याने सुतक लागते. ज्या दिवशी जेलमध्ये गेले होते त्याच दिवशी सुतक सुरु झाले. आणि बरोबर सव्वा महिन्यांनी दहशतवाद्यांनी त्यांना मारले आणि त्याच दिवशी त्यांचा अंत झाला, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले होते. त्यानंतर आज साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात मध्य प्रदेशमधील मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल झाली आहे.