कंपनीचा ई-मेल हॅक 52 लाख लुबाडले

लोणी काळभोर – अज्ञात व्यक्‍तीने परदेशातील कंपनीचा ई-मेल हॅक करून दुसरा ई-मेल पत्ता टाकून त्याद्वारे परदेशी बॅंकेत पाठविलेले 52 लाख 10 हजार 169 रुपये लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी किशोर बाळकृष्ण तांबट (वय 56, रा. आशिषकृपा सोसायटी, फ्लॅट नंबर 6, आजादनगर, कोथरूड, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात व्यक्तींविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेली माहिती अशी की, डायना बायोटेक कंपनीमध्ये (भांडगाव, ता. दौड) मुख्य वित्त अधिकारी म्हणुन किशोर तांबट काम करतात. सदर कंपनीचे प्रशासकीय कार्यालय कदमवाकवस्ती येथे आहे.

या ठिकाणावरून कंपनीचे काम चालते. सदर कंपनी सहा वर्षांपासुन लस आणि औषधे तयार करण्यासाठी आवश्‍यक असणारी मशिनरी तयार करते. भारतामध्ये तसेच परदेशी कंपन्यांना त्याची विक्री करते. कंपनीने यापूर्वी साउथ कोरिया, इराण, बांगला देश, सौदी अरेबिया आदी देशात मशिनरी पाठवली आहे. त्यामुळे कंपनीचे मुख्य संचालक विनोदकुमार पाटील यांची भारताबाहेर बऱ्याच लोकांशी ओळख आहे.

या ओळखीमुळे तैवान देशातील ग्लॅक बायोटेक कंपनी लि. कंपनीची मशिनरी पाठविण्याची ऑर्डर मार्च 2019 मध्ये कंपनीला मिळाली होती. सदरबाबत कंपनी व ग्लॅक बायोटेक कंपनी लि. यांच्यात करारनामा झाला. यानुसार सदर ऑर्डर भारतीय रुपयांमध्ये 12 कोटी 94 लाख 21 हजार 920 रुपये अशी आहे. ऑर्डर मिळवून देण्याकरिता चैन होम बायोटेक लिमिटेड तैवान या कंपनीने मदत केली होती, त्यामुळे त्या कंपनीला एकूण ऑर्डर पैकी 30 टक्के रक्‍कम टप्प्या-टप्प्याने देण्याचा कारारनामा दोन्ही कंपनन्यांत झाला आहे.

यानुसार व्यवहार सुरू करण्यात आला. मेलवरून दोन्ही कंपनीचा पत्रव्यवहार चालु होता. दिनांक 20 मे रोजी चैन होम बायोटेक कंपनीने इनव्हाइसचे तपशिलामध्ये सांगितल्याप्रमाणे बदल करून पाठविला, त्यासोबत टिड़ीएस भरण्याबाबतचे प्रमाणपत्र पाठविले होते. त्यावेळी पुर्वीच्या इनव्हाइस मध्ये पैसे पाठविण्यासाठी बदल केलेला दिसला. कंपनीने दुसऱ्या बॅंकेत पैसे जमा करायला सांगितले असावेत, असा तांबट यांचा समज झाला. म्हणून ते कोणाला काहीएक बोलले नाहीत. त्यानंतर कंपनीने दिनांक 6 ऑगस्टला शिनन बॅंक, बोट क्‍लब रोड, पुणे या बॅंकेतून नवीन इनव्हाइस प्रमाणे रक्‍कम पाठवली.

चैन होम बायोटेक लि.तैवान या कंपनीला पैसे जमा झाले अगर कसे याची खात्री करण्याकरिता त्यांना ई-मेल पाठविले; त्यानंतर तुम्ही दिलेले बॅंक डिटेल्स चुकीचे असून पैसे आम्हाला मिळाले नस्याचा तसेच मेल ऍड्रेस सुध्दा चुकीचे आहेत, असे तैवाणच्या बॅंकेने कळविले. त्यानंतर सदर पैसे थांबविण्याबाबत प्रयत्न झाले. पेरू देशातील बॅंकेने मेसेजव्दारे अमेरिकेतील जे पी.मॉंगन बॅंकेला कळविले की, ज्या कंपनीच्या बॅंक खात्यात पैसे जमा झाले आहेत, त्यांच्याशी आम्ही संपर्क करीत असुन संपर्क झाल्यावर पैसे परत पाठविण्यात येतील असे कळविले.

त्यानुसार दि. 22 ऑगस्टला अमेरिकेतील जे.पी.मॉंगन बॅंक आणि शिनन बॅंक यांच्यात ई-मेलद्वारे या पैशांबाबत बोलणी तसेच खात्री करण्यात आल्यानंतर पैसे सदर कंपनी अथवा त्यांच्या अकाउंटमध्ये आलेच नसल्याने समोर आले. यातून चैन होम बायोटेक लि. तैवाण या कंपनीचा ई-मेल अज्ञात व्यक्तीने हॅक करून बदलून त्याद्वारे पाठविलेले 52 लाख 10 हजार 169 रूपये लुबाडले असल्याचे उघड झाले, यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)