कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला तब्ब्ल 35 लाखांचा बोनस

वाॅशिंग्टन – अमेरिकेमधील सेंट जॉन प्रॉपर्टीज या रियल इस्टेट श्रेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना तब्ब्ल 35 लाखांचा बोनस दिला आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना नाताळ आणि नवीन वर्ष उत्साहात साजरा करता यावं म्हणून कंपनीने हा निर्णय घेतला.

दरम्यान, कंपनीने आयोजित केलेल्या एका खास पार्टीत कर्मचाऱ्यांना हा बोनस देण्यात आला. या पार्टीमध्ये कंपनीच्या सर्व 198 कर्मचाऱ्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पार्टीदरम्यान सर्वांना एक लाल रंगाच लिफाफा देण्यात आला.

अनेकांनी कूपन असतील वगैरे समजून हा लिफाफा उघडला आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण कंपनीने यंदा तुम्हाला 50 हजार डॉलरचा बोनस देत आहे, असं त्यात लिहिलं होतं. बोनसचा चेक स्विकारल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले.

Leave A Reply

Your email address will not be published.