पिंपरी – अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बायडेन यांच्यासोबतचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
बायडेन यांच्या भेटीबद्दल सांगताना कृष्ण प्रकाश म्हणाले, “जो बायडेन अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष असताना सन 2013 मध्ये मुंबईमध्ये आले होते. त्यावेळी मी साउथ मुंबई विभागात अप्पर आयुक्त म्हणून कार्यरत होतो.
बायडेन यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर होती. बायडेन यांच्या दौऱ्यात मुंबई पोलिसांनी उत्तम सुरक्षा पुरवली. त्यानंतर बायडेन यांनी मला बोलावून सर्व पोलिसांचे आभार मानले. हाच फोटो पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Congratulations to US President Elect Joe Biden 🎉#PresidentElect #JoeBiden pic.twitter.com/ZrzWPUElcK
— Krishna Prakash (@Krishnapips) November 9, 2020