गडाख यांच्याकडून मेंढपाळ कुटुंबांचे सांत्वन 

नेवासाफाटा – विषारी घटकद्रव्ये असलेल्या गवताच्या मुळ्या खाऊन मृत्युमुखी पावलेल्या मेंढ्याची पाहणी नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिताताई गडाख यांनी गोधेगाव येथे केली. मेंढपाळ कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केले. यावेळी मेंढपाळ बुचुडे परिवाराच्या कुटुंबीयांच्या आम्ही पाठीशी असून त्यांना प्रशासनाकडून न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. यावेळी गडाख यांना पाहून मेंढपाळ कुटुंबातील महिलांनी टाहो फोडला.
नेवासा तालुक्‍यातील गोधेगांव येथे शेतजमीन नांगरल्यावर गवताच्या विषारी गवताच्या मुळ्या वरती आल्याने त्या 100 ते 150 मेंढीच्या कळपाने खाल्याने आतापर्यंत 45 मेंढ्या दगावल्या आहेत. या घटनास्थळी पंचायत समिती माजी सभापती सुनिताताई गडाख, सभापती कल्पनाताई पंडीत यांनी तातडीने भेट दिली. शेतकऱ्यांनी पाऊस येईल या आशेने नांगरटी सुरू केल्या होत्या. त्यातून विषारी गवताच्या मुळ्या वरती आल्याने व त्या खाल्ल्या गेल्याने मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

मेंढपाळ व्यवसायावर उपजीविका करणारे नेवासा येथील रानमळा मारुतीनगर परिसरात रहाणारे मेंढपाळ आण्णासाहेब बुचूडे यांच्या मालकीच्या मेंढ्या भानुदास कोल्हे हे सांभाळत होते. मेंढ्यांच्या मृत्यूचा आकडा 27 वरून 45 वर गेल्याने बुचुडे कुटुंबीय हवालदिल झाले आहे. गडाख यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना शवविच्छेदनाचे नमूने तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचना यावेळी केल्या. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.वाजे, डॉ. मनोज आभाळे, डॉ. ज्ञानेश्वर काळे, डॉ. वीर, सरपंच राजेंद्र गोलांडे, उपसरपंच गोपीचंद पल्हारे, भगवानराव काळे, दिलीप शेलार, संजय पल्हारे, किरण जाधव, दत्तू पिंपळे, सुरेश दाणे, दशरथ डोईफोडे, धनगरवाडीचे सावळीराम कसबे, तुकाराम कसबे, बाप्पू शेलार, अशोक आदमने आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.