तुम्ही कधी विचार केला आहे की समस्त मानवजातीला वेठीस धरलेल्या, पृथवीतलावर ‘त्राही माम’ करून सोडलेल्या जगभरातील करोना विषाणूंना एकत्र केल्यास त्यांचे वजन किती भरेल? इस्रायलच्या वाईजमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या शास्त्रज्ञांनी नुकताच या विषाणूच्या वजनाचा अंदाज लावला आहे.
करोना विषाणूने महामारीच्या काळात जगभरातील 10 लाख ते 1 कोटी लोकांना संक्रमित केले आहे. याचा आधार म्हणून शास्त्रज्ञांनी जगभरात पसरलेल्या करोना विषाणूचे वजन मोजले आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जगभरातील एकत्रित करोना विषाणूंचे एकूण वजन 0.1 ते 10 किलो पर्यंत असू शकते. संक्रमित लोकांच्या संख्येवर आधारित शास्त्रज्ञांनी हा अंदाज लावला आहे.
सध्या जगात 173 दशलक्षाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे आणि 37 लाखांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. संशोधक रॉन मिलो यांचे म्हणणे आहे की कमी वजनाचा याचा अर्थ असा नाही की तो कमी धोकादायक आहे. हे संशोधन प्रोसीडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झाले आहे. विषाणूच्या कणांची संख्या एकत्र केल्यावर असे आढळून आले की संक्रमित व्यक्तीमध्ये एका मायक्रोग्रामपासून 10 मायक्रोग्रामपर्यंत व्हायरसचे कण असू शकतात.
प्राध्यापक मिलो यांच्या टीमने माकडावर हा प्रयोग केला. माकडाचे फुफ्फुस, टॉन्सिल आणि पाचक प्रणालीमध्ये व्हायरसचे प्रमाण मोजले. त्यानंतर त्यांनी प्रति ग्रॅम ऊतकांच्या विषाणूच्या कणांची गणना केली. मग त्याची तुलना मानवी ऊतकांच्या वस्तुमानाशी केली. व्हायरसच्या कमी वजनाचा अर्थ, जेव्हा करोनाचा प्रभाव कमी असतो आणि व्हायरसचा प्रभाव शिगेला पोहोचतो तेव्हा त्याचे 10 किलो वजन असते.