नगर -जिल्ह्याचे प्रशासकीय काम चोखपणे पार पाडत असताना निसर्गाचेही संरक्षण व संवर्धन व्हायला हवे अशी सतत तळमळ बाळगणारे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जखमी झालेल्या पिंगळा घुबडाला जीवदान दिले आहे.
जिल्हाधिकारी निवासात काही कारणामुळे जखमी झालेले एक पिंगळा प्रजातीचे घुबड पाण्याच्या हौदात पडल्याचे तिथले कर्मचारी ज्ञानेश्वर ढेसले व पोलीस अमोल घंगाळे यांना आढळुन आले. जिल्हाधिकारी यांच्या सांगण्यावरून जिल्हा निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्राचे निसर्गअभ्यासक जयराम सातपुते यांना बोलावले.
त्यावर प्रथमोपचार करून चौथ्या दिवशी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पिंगळा घुबडाला मुक्त करण्यात आले. मृत्युच्या मुखातुन बाहेर पडलेल्या या घुबडाने पुन्हा एकदा निसर्गात भरारी घेताच तेथे उपस्थित सर्वांनी आनंदाने जल्लोश केला. जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्रातर्फे चिमणी तथा तत्सम पक्षांच्या संवर्धनासाठी सूरू केलेल्या स्पॅरोहाऊस व बर्ड फिडर या राज्यातील पहिल्या जिल्हाव्यापी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.