पुणे – थंडीचा परिणाम मासेमारीवर घटली आहे. येथील बाजारात येणारी आवक घटली आहे. त्यातच गेल्या आठवड्याच्या तुलनेत मासळीला मागणी कायम आहे. त्यामुळे पापलेट, रावस, कोळंबीच्या भावात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, उर्वरित सर्व मासळीचे भाव स्थिर आहेत. थंडीमुळे अंडीला मागणी वाढली आहे. मागणीपेक्षा आवक कमी पडल्याने गावरान अंड्याचे भाव शेकड्यामागे पन्नास ते साठ रुपयांनी वाढले आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मटण, चिकन, इंग्लिश अंडीचे भाव स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी (दि. 29) खोल समुद्रातील मासळीची 15 ते 20 टन, खाडी 200 ते 300 किलो तर नदीच्या मासळीची एक हजार ते बाराशे किलो आवक झाली. आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची 15 ते 20 टन इतकी आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) :
पापलेट : कापरी : 1300-1400, मोठे 1200, मध्यम : 800-900, लहान 600-700, भिला : 480-550, हलवा : 400-440, सुरमई : 400-480, रावस : लहान 480 मोठा : 650, घोळ : 550, भिंग : 360, करली : 240, करंदी : (सोललेली) 480, पाला : लहान 600 मोठे 1200, वाम : 360-700, ओले बोंबील : 160-200, कोळंबी ः लहान 240, मोठी 400-480, जंबोप्रॉन्स : 1200, किंगप्रॉन्स : 700, लॉबस्टर : 1200, मोरी : 240-280, मांदेली : 100-140, राणीमासा : 200, खेकडे : 320, चिंबोऱ्या : 400.
खाडीची मासळी : सौंदाळे : 240, खापी : 240, नगली : 400, तांबोशी : 360, पालू : 240, लेपा : 200, शेवटे : 240, बांगडा : लहान 160-200 , मोठे 100, पेडवी : 100, बेळुंजी : 160, तिसऱ्या : 280, खुबे : 140-160, तारली : 160.
नदीची मासळी : रहू : 160, कतला : 160, मरळ : 480 शिवडा : 240, खवली : 240, आम्ळी : 160, खेकडे : 200 वाम : 500.
मटण : बोकडाचे : 640 बोल्हाईचे : 640 खिमा : 640, कलेजी : 700.
चिकन : चिकन : 200, लेगपीस : 240 जिवंत कोंबडी : 160, बोनलेस : 300.
अंडी : गावरान : शेकडा : 870 डझन : 120 प्रति नग : 10, इंग्लिश : शेकडा : 480 डझन : 72 प्रतिनग : 6.