आचारसंहिता पथकाने पकडले साडेसहा लाख

राहुरी तालुक्‍यातील वांबोरी फाटा येथे केली कारवाई

नगर  – नगर-मनमाड महामार्गावरील वांबोरी फाटा (ता. राहुरी) येथे आचारसंहिता पथकाने मोटरगाडीतून वाहतूक होणारी साडेसहा लाख रुपयांकी रक्कम पकडली आहे. पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली आहे. प्राप्तिकर विभागामार्फत या रकमेची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने आचारसंहितेची अंमलबजावणी व्हावी यासाठी भरारी पथकांची स्थापना केली आहे. पथकातील अधिकारी नियमितपणे वाहनांची तपासणी करत आहेत. वांबोरी फाटा येथे आज दुपारी मोटरगाडीची तपासणी करण्यात आली. यात अधिकाऱ्यांना मोटरगाडीतून साडेसहा लाख रुपयांची रक्कम सापडली. ही रक्कम पथकाने ताब्यात घेतली असून, पोलिसांमार्फत प्राप्तिकर विभागाकडे चौकशीसाठी देण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत ही चौथी कारवाई आहे. नगरमध्ये एका फायनान्स कंपनीवर कारवाई करत सुमारे 84 लाख रुपये जप्त केली आहे. टाकळी ढोकेश्‍वर (ता. पारनेर) येथे 20 लाख 45 हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. नगर शहरात 3 लाख 74 हजार रुपये जप्त केली आहे. या कारवाईपाठोपाठ आता वांबोरी फाटा येथे ही कारवाई केली आहे. या सर्व जप्त रकमांची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी होत आहे. आचारसंहिता पथकाकडून शेवगाव व संगमनेर येथेही असा प्रकारची कारवाई यापूर्वी करण्यात आलेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.