पुणे : शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे, आकाश निरभ्र असल्यामुळे गेल्या २४ तासांत किमान तापमानात तीन ते चार अंशांनी घट झाली. त्यामुळे रात्री हवेतील गारवा वाढला असून, पुढील आठवडाभर पुन्हा थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
रविवारी (दि. ८) शहरासह जिल्ह्यात सर्वात कमी माळीण येथे १३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर, दोन दिवसांपूर्वी १८ अंशावर असलेल्या किमान तापमानात चार ते पाच अंशांनी घट झाली आहे. त्यामुळे एन हिवाळ्यात उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना पुन्हा गारव्याने दिलासा दिला. शहर परिसरात किमान तापमान १५ अंशांपर्यंत खाली आले आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरात आकाश निरभ्र राहील, सकाळे हलके धुके पडेल तर किमान तापमानात काही अंशी घट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
रविवारी शहरासह जिल्ह्यातील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
माळीन – १३.२, लोणावळा – १४.४, एनडीए – १४.९, शिरूर १५.५, पाषाण – १६.३, शिवाजीनगर – १६.४, पुरंदर – १७, बारामती – १७.३, कोरेगांव पार्क – २०