नगर: महाराष्ट्र शासनाच्या स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल विभागाने घेतलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. त्यात नगर शहरातील केडगाव येथील अविष्कार राजकुमार आंधळे याने 99.99 टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
त्याने दहावीच्या परीक्षेतही अशोकभाऊ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 95. 60 टक्के मिळाले होते. बारावी सायन्समध्ये त्याला 94. 61 गुण मिळाले होते. आज जाहीर झालेल्या एमएचटी सीईटीमध्ये त्याला 99.99 गुण मिळाले आहेत. राज्यात प्रथम येण्याचा मान त्याने पटकावला आहे. तो भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचा विद्यार्थी आहे. त्याच्या यशात आई-वडील, शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. दररोज किमान आठ तास तो अभ्यास करत होता. त्याची मोठी बहीण ऋतुजा आंधळे ही कॉम्प्युटर इंजिनिअर आहे तर दुसरी बहीण ऐश्वर्या आयटी इंजिनियरच्या चौथ्या वर्षाला आहे. वडील राजकुमार आंधळे व्हीआरडीईमध्ये टेक्निकल ऑफिसर आहेत तर आई लतिका आंधळे या मेडिकल चालवतात.