पुणे – पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या मान्यतेने व सिटी फुटबॉल क्लबच्या वतीने सिटी क्लब करंडक बाद पद्धतीच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन आजपासून (12 नोव्हेंबर) होणार आहे. ही स्पर्धा मोशी (जिल्हा पुणे) येथे नव्यानेच तयार करण्यात आलेल्या फुटबॉल टर्फच्या मैदानावर होणार आहे.
करोना संकटानंतर क्लबस्तरावर होणारी ही पुणे शहरातील पहिलीच स्पर्धा आहे. सुपर डिव्हिजनमधील रूपाली एस. सी., एआयवायएफए, परशुरामियन्स एप. सी., इंद्रायणी एस. सी., संगम यंग बॉईज या संघांना प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीतील संघांचे आव्हान असणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक व रोख पारितोषिके दिली जाणार आहे.
यासह या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट गोलरक्षक, डिफेन्डर, मिडफिल्डर आणि उत्कृष्ट आघाडी फळीतील खेळाडू (फॉरवर्ड) यांनासुद्धा चषक देण्यात येणार आहेत.
स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना सिटी फुटबॉल क्लब विरुद्ध एएफए सॅमफोर्ड एफ. सी. यांच्यात होणार आहे. त्यानंतर केपी इलेव्हन विरुद्ध पुणेरी वॉरियर्स एफसी यांच्यात होईल.