भगवान शंकराचे लहानपण दिसणार “बाल शिव’मधून

बहुप्रतिक्षित “बाल शिव’ ही मालिका नुकतीच ऍन्ड टीव्हीवरून सुरू झाली. आतापर्यंत अनेक पौराणिक मालिका अनेक चॅनेलवरून प्रेक्षकांनी बघितल्या आहेत. आता देवांचे देव भगवान

महादेवाचे बालपण प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. भगवान शंकराच्या वेगवेगळ्या अवतारांबद्दल आपण ऐकले असेल. या अवतारांच्या कथा या मालिकेतून बघायला मिळणार आहेत.

मात्र, भगवान शंकराचा असाही एक अवतार आहे, ज्याच्याबद्दल फारसे कोणाला माहिती नाही. त्या बाल शिवाच्या अवताराची कथा ही या मालिकेतील प्रमुख कथा आहे. माता अनुसुयेच्या पोटी जन्म घेतलेल्या बाल शिवाची ही कथा असणार आहे.

बाल शिवाच्या भूमिकेत आन तिवारी हा बालकलाकार दिसेल. तर माता अनुसुयेच्या भूमिकेत मौली गांगुली असणार आहे. हिंदी टेलिव्हिजन वर्ल्डमधील अनेक आघाडीचे कलाकार या मालिकेत असणार आहेत.

बाल शंकराच्या अवतारातील कथा प्रथमच मालिकेच्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर येते आहे. यामध्ये भक्‍तीचे दर्शन तर घडणार आहेच. त्याचबरोबर पौराणिक कथेतील दृश्‍य संस्करणही बघायला मिळणार आहे. पौराणिक मालिका असल्यामुळे चमत्कारांचे स्पेशल इपेक्‍टही प्रेक्षकांचे मनोरंजन करेल हे नक्की.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.