मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर आणि सांगली परिसरातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मात्र, या महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर भागात मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. अशातच पूरग्रस्त बांधवांसाठी राज्यातील विविध भागातून मदतीचे हात पुढे येत असून या मदतीच्याकामी मराठी सिनेकलाकार आणि खेळाडूही मागे राहिले नाहीत.
दरम्यान, ‘मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री आपले एक महिन्याचं पूर्ण वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन पूरग्रस्तांना मदत करणार आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.
CM @Dev_Fadnavis and all the Ministers of #MaharashtraCabinet decides to donate one month’s salary towards #CMReliefFund for #MaharashtraFloods !
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 13, 2019