मुंबई – हॉर्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीन म्हणजेच अधिष्ठातापदी भारतीय अर्थतज्ज्ञ श्रीकांत दातार यांची निवड झाली आहे, त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिनंदनीय निवड आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या नव्या जबाबदारीच्या कामात मुख्यमंत्र्यांनी दातार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दातार हे मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधूनही पदवी घेतली आहे. सध्या ते लंडन येथे बिझनेस ऍडमिनीस्ट्रेशनचे प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत.
हॉर्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये या आधी नितीन नोहरिया हे अधिष्ठाता होते, त्यांच्या जागी दातार यांची निवड झाल्याने या पदावर लागोपाठ दुसऱ्यांदी भारतीय व्यक्तीची निवड झाली आहे. ही संस्था 112 वर्षांची जुनी संस्था असून ती जगातील एक प्रख्यात संस्था मानली जाते.
Hearty congratulations to Srikant Datar ji on being appointed as the new Dean of Harvard Business School. It is indeed a proud moment for the people of Maharashtra. I wish him the very best on this journey and for his future endeavours. https://t.co/KcOQm2Ppwv @Harvard
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 10, 2020