रेडा -पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या अंतर्गत इंदापूर तालुक्यातील बिजवडी-पळसदेव गटातील आजोती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी अचानक भेट देवून मुलांच्या गुणवत्तेची तपासणी केली. यावेळी मुलांना सामान्यज्ञानाचे प्रश्न विचारून मुलांची शाळाच घेतली.
शुक्रवारी (दि.28) सभापती माने यांनी आजोतीचे उपसरपंच राहुल साळुंखे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संतोष पतुले यांना सोबत घेवून दुपारी भेट दिली. माने यांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माने यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त 36 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप केले. मुलांची गुणवत्ता पाहून त्यांनी मुख्याध्यापक आबासाहेब शिंदे, सिकंदर मोमीन यांचे कौतुक केले.