१३ जणांचे अहवाल निगेटिव्ह
वेल्हे (प्रतिनिधी) : पानशेत परिसरातील करोनाची साखळी तोडण्यास प्रशासनाला यश आले आहे. वेल्हे तालुक्यातील कादवे येथील १३ जणांचे करोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी दिली.
कादवे येथील ४२ वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा झाल्याचे २३ जून रोजी स्पष्ट झाले होते.संबधित महिलेच्या संपर्कातील चौदा व्यक्तींना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये तेरा जणांची टेस्ट निगेटिव्ह, तर संबंधित महिलेच्या घरातील आणखी एका महिलेस करोनाचा संसर्ग झाल्याचे २४ जून रोजी निष्पन्न झाले होते.
या नवीन लागण झालेल्या महिलेच्या संपर्कातील आणखी १३ जणांचे स्वॅब (घशातील द्राव) वेल्हे येथील कोवीड केअर सेंटरमध्ये घेण्यात आले होते. ते २५ जुन रोजी तपासणीसाठी पाठविले असता २७ जुन रोजी त्या १३ जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
१)तालुक्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३५
२) बरे झालेले रूग्ण ३२
३) उपाचर घेत असलेले रूग्ण ३