सोरतापवाडी -उरुळी कांचन येथे रोजच करोनाचे रुग्ण आढळून येत असून करोनाची साखळी काही तुटत नसल्याचे दिसून येत आहे. बाधित महिलेच्या दोन वर्षांच्या मुलासह पतीचा अहवाल शनिवारी (दि. 11) पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. सुचेता कदम यांनी दिली.
त्यांच्या संपर्कातील 6 जणांना होमक्वारंटाइन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब घेऊन पुढील तपासणीसाठी पाठविणार असल्याचे डॉ. कदम यांनी नमूद केले. दरम्यान, पूर्व हवेली तालुक्यात करोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे करोनाची बाधा तालुक्याच्या मानगुटीवर बसली आहे.