नवी दिल्ली : करोनाने प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच आर्थिक पॅखेज जाहीर करण्याची शक्यता आहे. लहान उद्योग आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक महत्त्वाच्या मंत्रालयाशी चर्चा केली. त्याबाबत उद्योग जगतात औत्सुक्याचे वातावरण आहे.
यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासह अथर मंत्रालयातील अनेक वरीष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक बैठका घेतल्या. त्यामुळे पंतप्रदान लवकरच केंद्र सरकार उद्योग आणि कृषी क्षेत्रासाठी लवकरच दुसरे आर्थिक पॅकेज जाहीर करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह आणि निर्मला सीतारमन यांच्याशी चर्चा केली असून अर्थखात्याशी संबंधित इतर महत्त्वाच्या खात्यांशीही चर्चा करणार आहे. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग उद्योग मंत्र्यांशीही त्यांनी चर्चा केली अशी माहिती पीटीआयने दिली आहे. अर्थ मंत्रालय देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांसमोर एक सविस्तर सादरीकरण करणार असून आपल्या वेगवेगळ्या योजनांचीही माहिती देणार आहे.
लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे उद्योग क्षेत्रावर अवकळा आली आहे. या पार्श्वभूमीवर उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारतर्फे लवकरच आर्थिक फॅकेज नजाहीर केले जाईल. चार मे पासून सरकारने ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील जिल्ह्यासाठी काही निर्बंध शिथिल केले आहेत. या पार्श्वभूमीवर या पॅकेजकडे उद्योगज जगताचे लक्ष लागले आहे. मोदी यांनी याआधी वेगवेगळ्या मंत्रालयांच्या बैठकी घेतल्या आहेत. शुक्रवारी नरेंद्र मोदींनी नागरी उड्डाण, कामगार तसंच ऊर्जा मंत्रालयांसोबत चर्चा केली. अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी देशांतर्गत तसंच परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासंबंधी नरेंद्र मोदींनी आधीच वाणिज्य तसंच एमसएमई मंत्रालयांसोबत सविस्तर चर्चा केली आहे. या बैठकीमध्ये गृहमंत्र्यांसोबत अर्थमंत्रीही उपस्थित होत्या. छोट्या उद्योगांना पुनर्जिवित करण्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली
लॉकडाउनचा सर्वात जास्त फटका अर्थव्यवस्थेतील शेवटच्या घटकाला बसला असून त्यांच्यासाठी 1.7 लाख कोटींचं पॅकेज आधीच जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये मोफत धान्य, घरगुती गॅस तसंच गरीब महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक मदतीचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार गरीब तसंच उद्योगांना दिलासा देणारं पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे.