नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय घेण्यात आला निर्णय?
कमोडिटी तांदळाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यात मालावरील $490 प्रति टन किमान निर्यात किंमत काढून टाकली आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, “गैर-बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीसाठी MEP ची आवश्यकता तात्काळ प्रभावाने काढून टाकण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना फायदा होणार
बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यात मालावरील किमान निर्यात किंमत (एमईपी) काढून टाकूनही शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच जास्तीत जास्त तांदूळ विकला जावून त्यातून चांगला आर्थिक फायदा शेतकऱ्यांना होईल. तसेच भारतीय कंपन्या त्यांच्या किमतीनुसार परदेशात बिगर बासमती पांढरा तांदूळ विकू शकतील. या तांदळावरील किमान निर्यात किंमत काढून टाकण्यापूर्वी कंपनीला निश्चित किंमतीपेक्षा कमी दराने तांदूळ निर्यात करण्याची परवानगी नव्हती. पण आता असे होणार नाही.