मोठी बातमी! आता ऑक्सिजन कमी पडणार नाही; केंद्राकडून 162 प्लांट्सला अनुमती

नवी दिल्ली, दि. 18 – करोना रुग्णांसाठी ऑक्‍सिजन कमी पडत असल्याची बोंब देशात चारही बाजूने उठल्यानंतर आता केंद्र सरकारने आरोग्य उपयोगासाठी पीएसए पद्धतीचे 162 ऑक्‍सिजन प्लांट्‌स उभारण्यास अनुमती दिली आहे. त्यासाठी 201 कोटी रुपये खर्च येणार आहे. तथापि, या प्लांट्‌सपैकी ज्या महाराष्ट्रात आज करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत, त्या महाराष्ट्राला मात्र एकच प्लांट मंजूर झाला आहे.

अन्य राज्यांना मंजूर झालेल्या प्लांट्‌सनुसार मध्य प्रदेशात पाच प्लांट्‌स, हिमाचल प्रदेशात चार, चंदीगड, गुजरात आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी तीन, बिहार, कर्नाटक आणि तेलंगणांत प्रत्येकी दोन, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र, पदुच्चेरी, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांसाठी प्रत्येकी एक प्लांट मंजूर करण्यात आले आहेत.

या प्लांटसाठी जो 201 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे त्यात चौथ्या वर्षापासून सातव्या वर्षापर्यंतच्या मेंटेनन्सच्या खर्चाचाही समावेश असणार आहे. पहिली तीन वर्षे वॉरंटी पीरियड्‌समधील आहेत. देशात आजही 2 लाख 61 हजार 500 करोना रुग्ण आढळून आले असून, त्यातील अनेक रुग्ण क्रिटिकल असल्याने त्यांना सातत्याने ऑक्‍सिजनची गरज भासते आहे. राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांनी केंद्राकडे ऑक्‍सिजनची गेले काही दिवस सतत मागणी चालवली होती. त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.