राहुल गांधी यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली क्लीन चीट

चेन्नई – तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने क्लीन चीट दिली आहे. निवडणूक आयोगाकडे यासंबंधीची तक्रार करण्यात आली होती. चेन्नईतील विद्यार्थ्यांशी राहुल गांधी यांनी साधलेला संवाद हे आचारसंहितेचे उल्लंघन नसल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आहे. राहुल गांधी यांनी चेन्नई येथील स्टेला मॅरिस विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी या घटनेची संपूर्ण चौकशी केली असता त्यात राहुल गांधी यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले नसल्याचे म्हटले आहे. विद्यालयाच्या प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतरच १३ मार्चला राहुल गांधी यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे पूर्वपरवानगी घेतली असल्याने हा आचारसंहितेचा भंग होऊ शकत नाही, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हंटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.