किल्ले शिवनेरीवर वाड्याची भिंत कोसळली

जुन्नर – गेल्या महिन्यातील सततच्या पावसाने किल्ले शिवनेरीवरील शिवजन्म स्थळशेजारील सरकार वाड्याची भिंत कोसळली आहे. ह्या वाड्यात दोन मोठी दालने, स्वयंपाकघर, पाण्याची टाकी, न्हाणीघर आदी शिवकालीन अवशेष अजूनही असून पुरातन खाते या वाड्याचे संरक्षण व संवर्धनाबाबत उदासीन असल्याचे स्पष्ट होत आहे.

गेल्या आठवड्यात गडावरील पहिल्या दरवाजाजवळील संरक्षक भिंत कोसळली असून पुरातन खात्याचे याकडे दुर्लक्ष आहे. तसेच हत्ती दरवाजाशेजारील तटबंदी ढासळण्याच्या मार्गावर असून येथील दुरुस्तीबाबत शिवप्रेमी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. पुरातन खात्याच्या कारभारावर शिवप्रेमी व नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here