बॉलीवूड ताऱ्यांसाठी राजकारण ठरतेय करिअरचा दुसरा ऑप्शन 

मुंबई – बॉलीवूड तारे आणि तारकांसाठी राजकारण करिअरचा दुसरा ऑप्शन ठरत आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे त्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले आहे. राजकीयदृष्ट्या महत्वाच्या मुद्‌द्‌यांवर भूमिका घेत नसल्याचा ठपका नेहमीच बॉलीवूडमधील कलाकारांवर ठेवला जातो. मात्र, निवडणुका जवळ आल्या की त्यांचे महत्व वाढलेले दिसते.

प्रचारासाठी किंवा थेट निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी राजकीय पक्ष त्यांच्यापर्यंत पोहचतात. अर्थात, बॉलीवूडमधील कारकिर्दीचा सुगीचा काळ संपल्यानंतर पुढील पर्याय म्हणून बरेच कलाकार राजकारणाचा विचार करत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यातूनच जयाप्रदा, शत्रुघ्न सिन्हा, राज बब्बर, दिवंगत विनोद खन्ना यांसारखे काही कलाकार राजकारणात यश मिळवताना दिसतात. त्याउलट, अमिताभ बच्चन, गोविंदा यांसारखे बडे कलाकारही लवकरच राजकारणातून गाशा गुंडाळत असल्याचेही आढळते.

राजकारणात सर्वांत यशस्वी ठरलेले कलाकार म्हणून दिवंगत सुनील दत्त आणि विनोद खन्ना यांच्याकडे पाहिले जाते. जयाप्रदा आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या राजकीय कारकिर्दीकडेही यशस्वी म्हणूनच पाहावे लागेल. बच्चन यांनी राजकारणातून लवकर काढता पाय घेतला असला तरी त्यांच्या पत्नी जया बच्चन राजकीय पटलावर चांगला जम बसवून आहेत. बब्बर आणि हेमा मालिनी यांची राजकीय कारकिर्दही स्थिर मानावी लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक अशी ओळख निर्माण करणारे परेश रावल मागील निवडणुकीत विजयी झाले. मात्र, आताच्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आहे. प्रकाश झा, महेश मांजरेकर हे आघाडीचे दिग्दर्शक मात्र राजकारणात यशस्वी होऊ शकले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)