नवीदिल्ली – लिंकवर क्लीक केलं आणि पैसे गायब झाले, वीज न वापरूनही भरमसाट बिल आलं असे अनेक किस्से आजवर ऐकण्यात आले असतील. परंतु एखाद्या चारचाकी गाडीचा रिपेअरिंग खर्च त्या गाडीच्या किमतीपेक्षा दुप्पट आल्याचे कधी ऐकण्यात आले आहे का ? बंगळुरू येथील एका व्यक्तीसोबत हा प्रकार घडला आहे. याबाबतची माहिती त्याने स्वतः सोशल मीडियावर दिली आहे.
एका व्यक्तीने आपली 11 लाख रुपये किमतीची कार रिपेअरिंग सेंटरकडे दुरुस्तीसाठी पाठवली होती. दुरुस्ती सेंटरने त्याला 22 लाखांचे बिल दिले. यामुळे त्याच्या पाया खालची जमीन सरकली आणि तो विचार करू लागला की बिल देण्यापेक्षा गाडीचं शोरूमला सोडून जावी काय ? बेंगळुरू येथे राहणारा अनिरुद्ध हा एका प्रसिद्ध कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. व्हाईटफिल्ड परिसरात असलेल्या फोक्सवॅगन ऍपल ऑटोमध्ये त्यांनी आपली पोलो कार दुरुस्तीसाठी पाठवली.बंगळुरूमध्ये झालेल्या मुसळधार पावसातील पाण्याने त्याची कार खराब झाली होती.
तब्बल 20 दिवसांनंतर रिपेरिंग सेंटरने त्याला 22 लाख रुपयांचे बिल दिले. या संदर्भात त्यांनी विमा कंपनीशीही संपर्क साधला. आश्चर्याची बाब म्हणजे, खराब झालेल्या कारची कागदपत्रे तयार करण्यासाठी देखील त्याच्याकडून 44,840 रुपयांची मागणी केली.यानंतर अनिरुद्ध गणेशने फॉक्सवॅगन मॅनेजमेंटला ई-मेल पाठवून संपूर्ण समस्येची माहिती दिली. यानंतर कंपनीने टेकनिकल एररचा बहाणा देत 5000 रुपयांत प्रकरण मिटवले. बंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहने पाण्यात बुडाली. यात खूप नुकसान झाले होते.