मुलाच्या फुफ्फुसातून काढले पेनचे टोपण

कोलकाता : एका 12 वर्षाच्या मुलावर शस्त्रक्रिया करून त्याच्या फफ्फुसातून पेनचे टोपण काढण्यात आले. येथील शासकीय रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या मुलाची प्रकृती आता स्थीर आहे,असे डॉक्‍टरांनी सांगितले.

कोलकात्याच्या दक्षिणेकडील गारीया भागात हा मुलगा राहतो. त्याला ताप आणि न थांबणारा खोकला यामुळे शेठ सुखलाल करनानी स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे डॉ. अरूणाभा सेनगुप्ता यांनी सांगितले.

त्याच्या फफ्फुसात कोणती तरी बाहेरील वस्तू गेली असा आम्हाला संशय होता. त्यामुळे त्याचे सीटी स्कॅन केले. त्यात फुफ्फुसाच्या डाव्या बाजूला पेनचे टोपन असल्याचे आढळले. त्याने नोव्हेंबर महिन्यात हे टोपण गिळले होते. त्यावेळी त्याला स्थानिक डॉक्‍टरांकडे नेण्यात आले होते, असे त्याच्या पालकांनी सांगितल्याचे डॉ. सेनगुप्ता म्हणाले.

त्याच्यावर ब्रोन्कोस्कोपी करण्यात आली. त्याद्वारे हे टोपण काढण्यात आले. त्याच्या प्रकृतीचा धोका आता टळला आहे असे डॉक्‍टरांनी स्पष्ट केले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.