मतदान केंद्रापासून उमेदवार राहणार 200 मीटर लांब

मोबाईल 100 मीटर परिसरात वापरणे अन्‌ बाळगण्यास मनाई

नगर – जिल्ह्यात दोन्ही लोकसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी राजकीय पक्ष व उमेदवारांना मतदान केंद्रापासून 200 मीटर लांब पोलींग बूथ लावता येणार आहेत. तसेच मतदान केंद्र परिसराच्या 100 मीटर आत मोबाईल, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. केवळ अधिकृतरित्या निवडणूक कामांसाठी नियुक्‍त अधिकारी आणि पोलीस यांच्यासाठी यांना मोबाईल वापरता येणार आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी दि. 23 तर शिर्डीत दि. 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान केंद्र परिसरातील आदेश जारी केले आहे. 200 मीटर परिसराबाहेर पोलींग बुथ उभारता येणार असून याठिकाणी केवळ एक टेबल आणि दोन खूर्ची ठेवता येणार आहे. सावलीसाठी छत्रीचा आधार घ्यावा लागेल. त्याठिकाणी कनात किंवा तंबू उभारण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनीही या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांचा मतदार क्रमांक शोधणे सोपे व्हावे, यासाठी निवडणूक यंत्रणेप्रमाणेच राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून पोलींग बुथ लावले जातात. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मतदान केंद्राच्या आत 200 मीटर परिसरात असे बुथ लावता येणार आहे.

या अंतराच्या बाहेर संबंधितांना बुथ लावता येतील. त्याठिकाणी केवळ उमेदवारांचे नाव, पक्ष आणि त्याला निवडणूक आयोगाकडून मिळालेले चिन्हाचे केवळ एकच बॅनर लावता येईल. अर्थात असा बॅनर हा केवळ तीन ते साडेचार फूटापेक्षा जास्त मोठा असू नये, यापेक्षा मोठा बॅनर लावल्याचे निदर्शनास आल्यास तो तात्काळ काढून टाकण्याची कार्यवाही करण्यात येईल. संबंधित बुथवर विनाकारण गर्दी करता येणार नाही किंवा मतदानानंतरही तेथे थांबता येणार नाही.अर्थात अशा प्रकारच्या पोलींग बुथमुळे मतदान प्रक्रियेला कोणतीही अडचण अथवा अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी संबंधित पक्ष आणि उमेदवारांना घ्यावी लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.