दि पुना मर्चंट्‌स चेंबरच्या निवडणूकीत ‘हे’ उमेदवार झाले विजयी

पुणे – भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या ‘दि पुना मर्चंट्‌स’ चेंबरची द्विवार्षिक (2019-21) निवडणूक शुक्रवारी झाली. यामध्ये चेंबरचे विद्यमान अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले, राजेंद्र बाठीया, वालचंद संचेती यांच्यासह 15 जण निवडून आले. यातून आता अध्यक्षांची निवड होणार आहे.

निवडणूकीत 526 पैकी 486 उमेदवारांनी मतदाना हक्क बजावला. त्यापैकी 467 मते वैध ठरली. तर, 19 मते अवैध ठरली. या निवडणूकीसाठी निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून ऍड. हरिदास गुजराथी, ऍड. सुभाष किवडे आणि चेंबरचे कार्यालयीन सचिव विजय दामले यांनी काम पाहिले. विजयी उमेदवार आणि कंसात दिलेली मते राजेंद्र बाठिया (437), जवाहरलाल बोथरा (420), प्रवीण चोरबेले (419), विजय मुथा (402), अजित बोरा (400), अनिल लुंकड (399), अशोक लोढा (389), प्रकाश नहार (380), रायकुमार नहार (365), वालचंद संचेती (342), ईश्‍वर नहार (332), गिरीश कटारीया (326), विजय नहार (295), गणेश चोरडीया (291) आणि पोपटलाल ओस्तवाल (291) अशी विजयी झालेल्यांची नावे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.