शक्‍तीप्रदर्शनाने आघाडीचे उमेदवार उद्या अर्ज दाखल करणार

 धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत आघाडीची पहिली सभा

नगर: राष्ट्रवादी कॉंग्रेस – कॉंग्रेस आघाडीचे नगर दक्षिणेतील उमेदवार आमदार संग्राम जगताप व उत्तर शिर्डीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे उद्या (मंगळवारी)आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी जोरदार शक्‍तीप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे.

सकाळी दहा वाजता जुना बसस्थानक जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रचार रॅलीस सुरवात होईल. नगर शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली जाणार असून जिल्हाधिकारी कार्यालय येथे दोन्ही उमेदवार अर्ज भरणार आहेत. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता क्‍लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी दिली.

क्‍लेरा ब्रूस हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या मेळाव्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार वैभव पिचड, आमदार अरुण जगताप, आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, घनश्‍याम शेलार, बाबासाहेब भोस, सत्यजित तांबे, चंद्रशेखर घुले, प्राजक्त तनपुरे, शिवाजी गाडे, आदींसह कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.