लाड जळगाव येथे जनावरांची छावणी सुरू ; पाहिल्याच दिवशी 643 जनावरे दाखल

बोधेगाव: लाड जळगाव येथे जनावरांची छावणी सुरू करण्यात आली असून पाहिल्याच दिवशी 643 जनावरे दाखल झाली आहेत. शेवगाव तालुक्‍याच्या पुर्व भागात बोधेगाव, गोळेगाव, ठाकुर पिंपळगाव, राणेगाव नंतर लाड जळगाव येथे आज जनावरांची छावणी सुरू झाली. वरूर येथील साई सिद्धि कला क्रीडा, सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने ही छावणी सुरू करण्यात आली आहे. छत छावणीत जनावरासह दाखल झालेले शेतकरी विठ्ठल रामभाऊ पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून व जनावरांना चारा देवुन छावणीचे उद्‌घाटन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिपक म्हस्के व त्यांचे सहकारी वसंत विर, कल्याणराव तहकीक, अशोक तहकीक, अंबादास ढाकणे यांचेसह दिपक तहकिक, उपसरपंच दत्ता तहकीक, माजी सरपंच बाळाभाऊ तहकीक, कचरू उदे, अंकुश गरड, लहु पोटभर, युवा नेते दादासाहेब तहकीक, अमोल बर्डे, मधुकर तहकीक, काका मराठे, मनोहर तहकीक, अंबादास दराडे, बाबासाहेब पाटील, चव्हाण मामा, वीठ्ठल ढाकणे, कालिदास ढाकणे सह शेतकरी उपस्थित होते. लाड जळगाव मध्ये वसंत विर यांचे शेतात ही छावणी सुरू करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.