लाचखोर पैठणकरच्या घराची झाडाझडती

नगर (प्रतिनिधी) – मनपाचा लाचखोर घनकचरा  विभागप्रमुख डॉ. नरसिंह पैठणकर याचे घर व कार्यालयाची लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी तपासणी केली. यात काही फायली तसेच मालमत्तासंबंधी काही महत्वाची कागदपत्रे आढळली असून, 55 लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे.

मनपाच्या सावेडी कचरा डेपोत अडीच लाखांची लाच घेतांना पैठणकरला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईने मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनपा हद्दीत मृत जनावरांच्या दाहिनीचा प्रकल्प आहे.

या प्रकल्पासंदर्भात नेरीने त्रुटी काढल्या आहेत, असे सांगून त्याने प्रकल्प चालकाकडे पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 2 लाख 50 हजारांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.

याबाबत संबंधित प्रकल्प चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाकडे तक्रार केली होती. या कारवाईनंतर पथकाने पैठणकर याला घेवून त्याचे कार्यालय व त्याच्या घराची तपासणी केली. यात 55 लाखांची मालमत्ता असल्याचे सुत्राकडून समजले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.